मालवणात बोन मिनरल डेन्सिटी कॅम्प संपन्न…

*💫मालवण-:* मालवण येथील लिमये हॉस्पिटल व रोटरी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून लिमये हॉस्पिटल येथे विनामूल्य बोन मिनरल डेन्सिटी कॅम्प संपन्न झाला. यावेळी ९० महिलांची बोन मिनरल डेन्सिटी तपासण्यात आली . रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष ऍड. हेमेंद्र गोवेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी रोटेरियन डॉ अजित लिमये, रो. उमेश सांगोडकर, रो. डॉ लीना लिमये, रो. महेश काळसेकर, रो. ऍड सोनल पालव उपस्थित होते. यावेळी ९० महिलांची बोन मिनरल डेन्सिटी तपासण्यात आली. ज्यांच्यामध्ये हाडे ठिसूळ झाली आहेत असे जाणवले त्यांना उपचारांसंबंधी सल्ला देण्यात आला. अत्यंत आवश्यक असे तपासणी शिबिर घडवून आणल्याबद्दल महिलांनी आयोजकांचे आभार मानले. वेळेअभावी ज्यांची तपासणी होऊ शकली नाही त्यांच्यासाठी पुन्हा १० एप्रिल रोजी मोफत तपासणी शिबीर भरवण्यात येईल, असे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.

You cannot copy content of this page