मडुरा मंडळ परिसरातील सरपंचांची मागणी_
*💫बांदा दि.१०-:* ऑनलाईन नोंदी करताना तलाठ्यांकडून मूळ सातबारा, फेरफार वगैरे नोंदी मूळ दप्तरी असून त्यामध्ये बऱ्याच चुका झालेल्या आहेत. अशा चुकांच्या तक्रारी करण्याचे आवाहन सावंतवाडी तहसिलदार यांनी केले खरे मात्र, कोणत्याही शेतकऱ्यांच्या तक्रारीची वाट न पाहता जे दस्तएवज ऑनलाईन नोंद केलेले आहेत ते सर्व महसूलकडील विहीत दस्तएवज समोर घेऊन तपासावे आणि ज्या चुका झालेल्या असतील त्या त्याचवेळी दुरूस्त करून द्याव्यात तसेच त्यांचे जे जुने दस्तएवज आहेत ते त्याप्रमाणे ऑनलाईन करून घ्यावेत, अशी मागणी मडुरा मंडळ परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने सर्व सरपंचांनी मडुरा मंडळ अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदविण्याच्या दिवशी केली आहे. मडुरा मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना रोणापाल सरपंच सुरेश गावडे, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, कास सरपंच खेमराज भाईप, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर, सातार्डा प्रभारी सरपंच दशरथ मयेकर, आरोस सरपंच शंकर नाईक व सातोसे सरपंच मदन सातोसकर तसेच शेतकरी उपस्थित होते.
