“अब दिल्ली दूर नही”…

विशाल परब याच्या शहरातील बॅनरची सर्वत्र चर्चा…

⚡सावंतवाडी ता.१५-: युवा उद्योजक भाजपा नेते विशाल परब याने आपल्या नावाप्रमाणेच आपला वाढदिवस विशाल अशा भरगच्च कार्यक्रमाने आयोजित केला आहे. सावंतवाडी शहरात तसेच तालुक्यात याबाबत ठिकठिकाणी बॅनरही लागले आहेत परंतु शहरात लागलेल्या बॅनर पैकी “अब दिल्ली दूर नही” या बॅनरची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

विशाल परब हे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन तसेच एवढा मोठा खर्च नेमका कशासाठी करत आहे हा नेहमीच सर्वांना पडलेला प्रश्न आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्यासोबत ते दिवस रात्र सावलीप्रमाणे असतात त्यांनाही त्यांनाही कधी विशाल परब यांच्या आपल्या मनातील गोष्ट ओळखता आली नाही. मात्र आज लागलेल्या या बॅनर मधून त्यांचे भविष्यातील राजकीय चित्र आपोआप चर्चेला आले आहे.

You cannot copy content of this page