जिमखाना मैदानाला कडेकोट पोलिस बंदोबस्त; खासगी सुरक्षेतही वाढ…
⚡सावंतवाडी ता.१५-: येथील जिमखाना मैदानावर विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जुबी नौटीयाल यांच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी पूर्ण झाली असून यावेळी पोलिसांसह तसेच खाजगी सुरक्षकांचा मोठा फौज तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान जुबिन नौटियाल यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी सावंतवाडीसह इतर राज्यातील लोक येणार असून त्यामुळे तोबा गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खाजगी सुरक्षासह पोलिसांचा मोठा फौज तैनात करण्यात आला आहे.सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.श्री. परब यांचा आज वाढदिवस होत असून त्यांना जिल्हाभरासह राज्यातून अनेक ठिकाणी शुभेच्छांचा वर्षा होत आहे.
