⚡सावंतवाडी ता.१५-: सामाजिक व राजकीय क्षेत्रात वाटचाल करित असतांना कमी वयात स्वकर्तृत्वावर एक यशस्वी उद्योजक म्हणून विशाल प्रभाकर परब यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीपर्यंत आपली नावाची छाप सोडली आहे. केद्रीय मंत्री नारायण राणे कुटुंबातील हक्काचा सदस्य म्हणूनही विशाल परब यांच्याकडे पाहीले जाते. विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यामातून कित्येक वर्षे त्यांनी कोणत्याही स्वार्थ न बाळगता जनसेवेचा वसा हाती घेत आपली सामाजिक वाटचाल सुरू ठेवली आहे. अशा या विशाल मनाच्या माणसाला “ग्लोबल महाराष्ट्र”कडून विशाल शुभेच्छा…!!!
विशाल या नावातच विशाल आहे आपल्या नावाप्रमाणेच विशाल याने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. आज त्याच्याकडे कोणतेही राजकीय पद नसतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे कुटुंबाच्या आर्शिवादाने त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. भारतीय जनता पक्षासाठी ते माजी खासदार निलेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी महाराष्ट्र नव्हे तर दिल्लीपर्यंत मजल मारली आहे.गेली कित्येक वर्ष विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे. अडल्या नडलेल्यांसाठी तसेच गरजू गरिबांसाठी त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. कला क्रिडा , सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले असून जिल्ह्यात कुडाळ येथे सर्वात प्रथम शिवछत्रपती आधारीत महान नाट्य त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले होते.
राजकिय क्षेत्रात काम करत असतांना त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढीसाठी नेहमीच काम केले. मात्र कधीच कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठीशी ते सावली सारखे उभे आहे. त्याच्या माध्यमातून ते भाजपसाठी काम करत आले आहेत मात्र असे असले तरी नारायण राणे यांचे मार्गदर्शन त्यांना नेहमीच लाभले आहे. राणे कुटूंब शब्द त्यांनी कधीच टाळला नाही त्यामुळे राणे कुटुंबातील हक्काचा सदस्य म्हणून श्री परब यांच्याकडे पाहीले जाते.
मुळात १५ ऑक्टोबर या दिवशी विशाल परब यांचा वाढदिवस मात्र आपला वाढदिवस फक्त एक दिवस साजरा न करता आठ दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने ते दरवर्षी वाढदिवस साजरा करत आले आहेत. यावर्षी त्यांनी विशाल अभिष्टचिंतन या कार्यक्रमातून विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला. यात ह.भ.प इंदुरीकर महाराज, महीलांसाठी खेळ पैठणीचा, तसेच राज्यस्तरीय दांडिया नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. तर उद्या होणाऱ्या वाढदिनी त्यांनी महाराष्ट्र आणि गोव्यात प्रथमच प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शो आयोजित केला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य किती विशाल आहे हे यातून दिसून येते. त्यामुळेच विशाल मनाच्या माणसाला पुन्हा एकदा ग्लोबल महाराष्ट्र चॅनल कडून वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
