माझ्या मित्राला अशीच उंच शिखर गाठण्याची शक्ती देओ…

संजू परब: फटाक्यांची आतिषबाजी करत मोती तलावर विशाल परब यांचा वाढदिवस केक कापून साजरा…

सावंतवाडी ता.१४-: माझा मित्र आज एका मोठ्या पदावर गेला आहे पाटेकर उपलकर यांनी माझ्या मित्राला अशीच उंच शिखर गाठण्याची शक्ती देओ असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे काढले

दरम्यान प्रत्येक यशाच्या मागे कोणाची ना कोणाची साथ असते त्यांच्या मागे तर त्यांच्या सौभाग्यवतिचीच साथ आहे त्यामुळे विशाल परब या पुढे मोठा उद्योजक होवो त्याच्या मनातील असलेली खासदारकीची इच्छा देखील पुरी होवो अशी अपेक्षा देखील आपण सर्वांनी करू असे प्रतिपादन देखील नगराध्यक्ष संजू परब यांनी केले

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत तसेच अमूल मित्र मंडळाच्या वतीने विशाल परब यांचा केक कापून वाढदिवस मोती तलावकाठी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पदाधिकारी व नागरिक मोठी संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page