पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची कारवाई ; सुरज पाटीलवर उपचार सुरुच..
सावंतवाडी,दि.१४ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
लाचलुचपत विभागाने सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला अटक केली तर पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दोघांनाही निलंबित केले आहे. तसेच दुसऱ्या प्रकारणात साक्षीसाठी न्यायालयात गेलेले पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी यांना आज पदभार स्वीकारला आहे.
पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे असे म्हणाले.दरम्यान फ्लॅट फसवणूक प्रकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन तपास अंमलदार बदलण्यात आला होता असेही पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी साक्षीसाठी न्यायालयात गेले होते त्यामुळे पदभार दोडामार्ग पोलिस निरीक्षक अरूण पवार यांच्याकडे गुरूवारी देण्यात आला होता. आज पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.
गुरूवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तो दि.१६ ऑक्टोबर पर्यंत तपासासाठी पोलिस कोठडी मध्ये असून सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाचे अधिकारी श्री पवार चौकशी करत आहेत तर पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मात्र जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याने तुर्त अटक टळली आहे. त्याची तब्येत सुधारल्या वर पोलिस ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करतील.
