⚡मालवण ता.१४-: बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ( राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर) शहर शाखा मालवणच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन समाज मंदिर,बौध्दवाडी मालवण येथे साजरा करण्यात आला. यावेळी त्रीसरण, पंचशील ग्रहण करण्यात आले.
यावेळी सचिव बबन मालवणकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमाला माजी श्रामणेर आनंद धामापूरकर, शहर अध्यक्ष पुरुषोत्तम मालवणकर, सिध्दार्थ जाधव, पी. के. चौकेकर, नरेंद्र पेंडूरकर, ऍड. सुमीत जाधव, श्रीकांत मालवणकर, नरेश वायंगणकर , महेश जाधव आदी उपस्थित होते.
