बाळासाहेब पाटील; मंत्री दिपक केसरकरांवर नाव न घेतां टिका
⚡सावंतवाडी ता.१३-: राज्य सरकारमधील मंत्र्यांचे आपल्या मतदारसंघातील प्रशासनावर अंकुश नसल्याने काल सावंतवाडीत पोलीस अधिकारी हे लाच घेताना सापडल्याची घटना घडल्याचं दिसून आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता केली आहे.
दरम्यान हे सरकार जनतेचे प्रश्न सोडून त्यांना न्याय देऊन दिलासा देण्याचा काम करण्याऐवजी ते फक्त उद्धव ठाकरे यांनी काय केलं यावरच फक्त टीका करण्याचे काम ते करत आहेत अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली ते आज सावंतवाडीत राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी माजी मंत्री पाटील पुढे बोलतात म्हणाले की लोकांचा रोष बाहेर पडेल म्हणून
राज्य सरकार स्थानिक निवडणुका घ्यायला घाबरत आहेत, तसंच एक गट इकडे एक गट तिकडे होईल त्यामुळे निवड हिंदुत्वाचा अजेंडा पुढे न्यायचा हा एक कलमी कार्यक्रम सध्या राज्य सरकार करत असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला.
