⚡मालवण ता.१३-: मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचरे येथे राजकीय उलथापालथीच्या घटनांना वेग आला असून भारतीय जनता पक्षाने शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. आचरा ग्रा. प. चे माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर आणि सौ. वायंगणकर यांनी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
भाजप पक्ष प्रवेशांनतर बोलताना पाडूरंग वायंगणकर यांनी आपल्या भागातील तांडेलवाडी ते समुद्र किनारा तसे इतर विकास कामे भाजपच्याच माध्यमातून होवू शकतो याबाबत खात्री झाल्यामुळेच आपण दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, माजी जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गावकर, आचरा विकास सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, मंगेश गावकर यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
