प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने १३ ते १४ मार्च कालावधीत आमदार कपिल पाटील चषकाचे आयोजन
*💫सिंधूदुर्गनगरी दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने आमदार कपिल पाटील चषक २०२१ या जिल्हा स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा १३ ते १४ मार्च २०२१ या कालावधीत ओरोस क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथम येणा-या बारा शिक्षक संघानाच प्रवेश देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक- ७७७७ रुपये व चषक दया नाईक , राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती पुरस्कृत, प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली कडून. द्वितीय क्रमांक ५५५५ रुपये व चषक किसन दुखंडे, राज्य संघटक व चषक विजय चौकेकर शिक्षक नेते मालवण पुरस्कृत यांजकडून. इतर आकर्षक बक्षिसे उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज प्रत्येकी 555 रुपये तुकाराम खिल्लारे यांचेकडून, सलग ३ षटकार किंवा सलग ३ विकेट ५००रुपये व मालिकावीर ५५५ रुपये व चषक रामचंद्र डोईफोडे जिल्हा मुख्य संघटक सिंधुदुर्ग , यांचेकडून तसेच स्पर्धेत सहभागी प्रत्येक खेळाडूला भेटवस्तू व प्रमाणपत्र , सेमिफायनल सहभागी संघांना आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. ११ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रवेश फी भरून संघांची नाव नोंदणी करावी . नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक बंडू राठोड 9359156396, सागर कुराडे 9405838020, वसंत गर्कल 7588056729 येथे संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व जिल्हा सरचिटणीस अरूण पवार व महेश नाईक मुख्य सल्लागार यांनी केले आहे.
