_सामाजिक बांधिलकी जोपासत केला महिला दिन साजरा
*💫सावंतवाडी दि.०९-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कॉंग्रेस पक्षातर्फे सविता आश्रम अनाव येथे धान्य, बिस्कीट, तसेच नवीन कपडे यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कार्यकारणी सदस्य सौ. विभावरी सुखी, एन.एस.यू.आय. सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष तथा सोशल मीडिया सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष जास्मीन लक्ष्मेश्र्वर, संदीप सुखी आदींच्या हस्ते हे साहित्य सविता आश्रम च्या महाव्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच यावेळी आश्रमात अजुन कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे यांची माहिती घेण्यात आली असून, त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
