⚡कणकवली ता.११-: कणकवली उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या, सर्विस रोड वरील पथदिप गेल्या काही महिन्यापासून बंद स्थितीत असल्या मुळे संपूर्ण हायवे वर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. रात्री अपरात्री बाजारपेठमध्ये आलेल्या सामान्य नागरिकांनी अंधारातून चालायचे कसे ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केला आहे.
याचा सर्वात मोठा त्रास महीला वर्गाला सहन करावा लागत आहे.अंधाराचा फायदा घेऊन कोणी तरी काही बरेवाईट करण्याचा प्रयत्न केला तर, या सर्वांची जबाबदारी कोण घेणार.
तरी संबंधित कोणी अधिकारी असतील तर त्यांनी वेळीच दखल घ्यावी, अन्यथा समस्त कणकवली करांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. तरी वेळीच दखल घ्या अशी मागणी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे.
कणकवलीत सर्विस रोड वरील पथदिप बंद असल्याने गैरसोय…
