दोडामार्गात आज महिलांसाठी ” न्यू होम मिनिस्टर”…

भाजपा नेते विशाल परब वाढदिवसाचे औचित्य ; सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर आणणार कार्यक्रमात रंगत

⚡दोडामार्ग ता.११-: भाजपा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या विशाल अभीष्टचिंतन सोहळ्यातील दोडामार्ग तालुक्यात होणाऱ्या सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत “न्यू होम मिनिस्टर” या महिलांसाठी खास कार्यक्रमाची पुर्ण तयारी विशाल परब मित्रमंडळाने केली असून सायंकाळी ५ वाजता शुशिला हाॅल दोडामार्ग येथे (तिलारी रोड) येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवावा असे आवाहन विशाल परब मित्रमंडळ व भाजपा कडून करण्यात आले आहे.

कुडाळ येथील शुभारंभाच्या कार्यक्रमाला झालेली तुफान गर्दी लक्षात घेता या कार्यक्रमाचेही नीटनेटके आयोजन करण्यात आले असून सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर या कार्यक्रमात रंगत आणणार यात शंकाच नाही.

You cannot copy content of this page