दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाचे आयोजन
मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहरातील भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सवाल जवाबाची संगीत भजनबारी आयोजित करण्यात आली आहे.
गुरुवर्य श्रीधर मुणगेकर श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ बोरवली मुंबईचे बुवा विशाल मसुरकर, पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार विरुद्ध गुरुवर्य कोकण रत्न संतोष शिरसेकर श्रीराम प्रसादिक भजन मंडळ शिरसे राजापूरचे बुवा रत्नभूषण अमित शिरसेकर, पखवाज अजित शिरसेकर, तबला संकेत तांबे यांच्यात सवाल जवाबाची संगीत भजन बारी रंगणार आहे. तरी भजनप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
