दानोली येथील ढगफुटिने पारपोली, देवसू, दानोली, केसरी भागाला फ्टका..

सावंतवाडी ता.१०-:

आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दाणोली परिसरात दुपारनंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे सर्वांची दाणादाण उडाली. याचा सर्वाधिक फटका दाणोली गावठण परिसराला बसला.
नदीच्या पुराचे पाणी कापणीच्या प्रतिक्षेत असलेल्या भात पिकात शिरल्यामुळे आता तोंडाशी आलेल्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. लवू महादेव लटम यांचा नदी लगतचा सुमारे फूट लांबीचा दगडी संरक्षक कठडा नदीच्या पुराच्या पाण्याबरोबर अक्षरशः वाहून गेला.
दाणोली गावठण येथील पूलावर आज पर्यंतच्या इतिहासात प्रथमच तीन फूट उंचीवरून पाणी वाहत होते.
या अतिवृष्टीचा फटका पारपोली देवसू, दाणोली,
केसरी आदी गावांनाही बसला.

You cannot copy content of this page