घटनास्थळी नागरिकांची धाव; लाखोंचे नुकसान
⚡कुडाळ ता.१०-: कुडाळ तालुक्यातील नेरुर वाघोसेवाडी येथील सदानंद उर्फ नंदू खवणेकर यांच्या घरासमोर लावलेली रिक्षा अज्ञात इसमानी जाळून टाकल्याची घटना घडली.
ही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, रिक्षाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनास्थळी उपस्थित असलेले शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी पोलिसात खबर दिली.
