कणकवली येथे १४ ऑक्टोंबर रोजी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

⚡कणकवली ता.१०-: जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (महाराष्ट्र) चे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा शनिवार १४ ऑक्टोबर २०२३ सकाळी १० पासून विद्यामंदिर हायस्कूल पटांगण, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.

स्व-स्वरूप संप्रदाय, जिल्हा सिंधुदूर्ग यांच्यावतीने या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने
पादुका व गुरुपूजन सोहळा,श्रींचे पादुकाचे आगमन,सामाजिक उपक्रम,गुरुपूजन,आरती सोहळा
प्रवचन,उपासक दीक्षा,दर्शन, पुष्पवृष्टी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहून पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्व-स्वरूप संप्रदाय, जिल्हा सिंधुदूर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page