शिवसेना शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी केले होते आयोजन
बांदा/प्रतिनिधी
बांदा शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर मित्रमंडळातर्फे खास गणेशोत्सवनिमित्त प्रभाग क्रमांक ५ मर्यादित घरगुती गणेश सजावट आणि गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पारितोषिके प्रदान करण्यात आली.
ही स्पर्धा प्रभाग पाच मधील हॉस्पिटल कट्टा, सुतारवाडी, काळसेवाडी, आंबेडकर नगर यांच्यासाठी मर्यादित ठेवण्यात आली होती. गणेश आरास सजावट स्पर्धेत परेश कोचरेकर, अनुज बांदेकर, प्रथमेश मेस्त्री व नाईक परिवार यांनी अनुक्रमे प्रथम चार क्रमांक मिळविले. त्यांना रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.
गणेश मूर्ती सजावट स्पर्धेत कांता हळदणकर, प्रदीप वाळके, गोविंद बांदेकर, नागेश बांदेकर यांनी अनुक्रमे प्रथम चार क्रमांक मिळविले. विजेत्यांना रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, प्रशांत कोचरेकर, विठ्ठल उर्फ भाऊ वाळके यांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
