तालुक्यातील युवकांचा मनसेमध्ये प्रवेश…

आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश; उपरकरांकडून स्वागत..

सावंतवाडी ता१०-: येथील तालुक्यातील काही युवकांनी मनसेचे माजी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली आज मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश जाहीर केला. दरम्यान यावेळी उपरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक पेडणेकर, प्रणित टाळकर, विशाल गांवकर नितीन गावकर, ओंकार गांवकर अतुल गांवकर,विशाल बर्डे,ज्ञानेश्वर नाईक आदीनी यावेळी प्रदेश केला.

You cannot copy content of this page