शिवसेना स्टाईलने भाजपशी लढणाऱ्या देवगड युवासेना तालुका प्रमुखाचा सत्कार…

जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची गणेश गावकर यांना कौतुकाची थाप..

⚡कणकवली ता.१०-: देवगड ग्रामीण रुग्णालयातील समस्यांच्या मुद्द्यांवरून ठाकरे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी एकमेकांना भिडले होते. ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेचे देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना स्टाईल दाखवली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते त्यांना भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


सुशांत नाईक यांच्या निवासस्थानी झालेल्या या सत्कार प्रसंगी देवगड तालुका प्रमुख जयेश नर, युवासेना जिल्हा समन्वयक राजु राठोड, तालुका प्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक तेजस राणे, फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे,कणकवली उपशहरप्रमुख वैभव मालंडकर, नितेश भोगले, रोहित राणे, किरण वर्दम, प्रतिक रासम, प्रसाद चव्हाण, महेश राणे, गुरुनाथ पेडणेकर,चेतन पाटील आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page