शिवम म्हाडेश्वर वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡कुडाळ ता.०९-: शिवम निलेश म्हाडेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य मित्रमंडळ, माठेवाडा कुडाळ आणि प्रभावळकरवाडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर आज संपन्न झाले. या रक्तदान शिबीरात ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन जि. प. माजी सदस्य संजय भोगटे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तसेच विजय सावंत, संजय कोरगावकर, निलेश म्हाडेश्वर या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुख्य उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्‌घाटन केले.

या शिबीराला माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, विजय सावंत, संजय कोरगावकर, पप्या तवटे, ओंकार तेली, सुनील बांदेकर, आनंद शिरवलकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, साक्षी सावंत, रेखा काणेकर, नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, राजू गवंडे, विजय तेंडुलकर, सनी कुडतरकर आदी मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी स्वराज्य मित्रमंडळ आणि प्रभावळकर वाडा मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page