दिलीप परब : युतीच्या काळात मिळाली पुलाला मंजुरी, स्वार्थाचे राजकारण कुणी करू नये..
बांदा : प्रतिनिधी
सद्यस्थितीत मडुरा माऊली मंदिर जवळील पुलाच्या कामावरून सुरू असलेल्या श्रेयवाद विनार्थ आहे. दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या उठावामुळे पुलाचे काम मार्गी लागले. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातूनच माऊली मंदिर पुलाचे काम झाल्याचे शिवसेना (शिंदे गट) सातार्डा विभाग प्रमुख दिलीप परब यांनी सांगितले.
मडुरा दशक्रोशीतील असंख्य नागरिकांनी या पुलासाठी उठाव केला होता. याची दखल त्या वेळेचे पालकमंत्री व आताचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली. यासाठी आपण स्वतः पाठपुरावा केल्याचे श्री परब यांनी सांगितले. या उठावात माजी नगराध्यक्ष संजू परब यांचेही सहकार्य लाभले. त्यामुळे सद्यस्थितीत श्रेयवादाचे राजकारण बाजूला ठेवत पुलाचे काम मार्गी लागले हेच महत्त्वाचे आहे. तसेच भविष्यातही गावातील विकास कामासाठी शिक्षण मंत्री दीपक केसकर यांच्या माध्यमातून निधी आणून विकास केला जाईल. मात्र असे श्रेयवादाचे राजकारण कोणी करू नये असे आवाहन शिवसेना (शिंदे गट) सातार्डा विभाग प्रमुख दिलीप परब यांनी केले आहे.
