बांदा नट वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…

⚡बांदा ता.०३-: बांदा शहरातील सांस्कृतिक चळवळीचे मानबिंदू असलेल्या नट वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, संचालक शंकर नार्वेकर, अनंत भाटे, श्री आगा, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, लिपिक सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.

यावेळी अनंत भाटे व शंकर नार्वेकर यांनी महात्मा गांधी व शास्त्री यांच्याबद्दल विचार व्यक्त केले. आभार निलेश मोरजकर यांनी मानले.

You cannot copy content of this page