पक्षाच्या सेवा सप्ताहाचे निमित्त; माजी खासदार निलेश राणेकडून औषध पुरवठा
⚡मालवण ता.०३-: भारतीय जनता पार्टी सेवा सप्ताह निमित्त भाजपा मालवण तालुक्याच्या वतीने सफाई कामगारांचे मधुमेह, लिव्हर, किडनी,हिमोग्लोबिन तपासणी शिबिर भाजपच्या मालवण कार्यालयामध्ये संपन्न झाले. यावेळी तपासणी केलेल्या सर्व कामगारांचे आरोग्य अहवाल मालवण नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असून ज्या कामगारांना उपचारांची किंवा औषधाची आवश्यकता असेल त्यांना भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक व माजी खासदार निलेश राणे यांच्या सहकार्याने औषध पुरवठा करण्यात येणार आहे.
के.जी. डायग्नोस्टीक लॅब मालवण यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात लॅबचे संचालक किरण प्रकाश गोसावी तसेच गौरी मिस्त्री व प्रीती केळुस्कर यांचे सहाय्य लाभले. या शिबिराला भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग आदी उपस्थित होते.
