उसप ग्रामपंचायत परिसर केला चकाचक

⚡दोडामार्ग ता.०३-: महात्मा गांधी जयंती निमित्त उसप ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमान्तर्गत साफसफाई करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच रुचिता गवस, उपसरपंच दाजी नाईक , ग्रामसेवक विशाल जाधव व कर्मचारी प्रकाश गवस, संतोष जाधव , तसेच विलास मोरजकर, प्रवीण गवस, चंद्रकांत नाईक, औदुंबर बांदेकर, सूर्यकांत मोरजकर,सचिन गवस, बाबू कळणेकर, संजू नाईक, दिगंबर बांदेकर, अमित गवस आदींनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन ग्रामपंचायत कार्यालय परिसरात साफसफाई केली.

You cannot copy content of this page