भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवस कार्यक्रमाचा ट्रेलर लाॅन्च…

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांच्या कार्यक्रमाची जिल्हावासियांना उत्सुकता..

⚡सावंतवाडी ता.०२-: येथील भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या वाढदिवसाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

भाजप युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवसानिमित्त ९ ते १५ ऑक्टोबर असे आठवडाभर सामाजिक व सांस्कृतिक मनोरंजनात्मक होणार आहे. यासाठी विशाल परब मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले.


यामध्ये गोवा व सिंधुदुर्ग प्रथमच जुबिन नौटियाल यांच्या लाईव्ह गाण्याच्या शो होणाल आहे. प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प इंदुरीकर महाराज याच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाने होणार आहे. दरम्यान या संर्पुण कार्यक्रमाचा ट्रेलर आज विशाल परब मित्रमंडाकडून लाॅन्च करण्यात आला.

You cannot copy content of this page