देवली खालची येथील तरूण राहत्या घरातून बेपत्ता…

⚡मालवण ता.०२-: देवली खालची येथील राजेश तुकाराम चव्हाण (वय ४८) हा तरूण राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ गणेश चव्हाण याने येथील पोलीस ठाण्यात दिली आहे.

३० सप्टेंबरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास राजेश हा घरातून निघून गेला. सकाळी शोधाशोध केली असता तो सापडला नाही. राजेशची उंची साडे पाच फूट असून रंग गोरा आहे. त्याने पांढऱ्या रंगाचे शर्ट व हाफ पँट परिधान केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुभाष शिवगण करत आहेत.

You cannot copy content of this page