*अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या चार डंपर वर महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई

*💫सावंतवाडी-:* अनधिकृरित्या वाळूची चोरटी वाहतूक करताना चार आयशर डंपर ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कारवाई सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास इन्सुली चेक पोस्ट येथे सावंतवाडी महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त टीमने केली आहे. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी अनधिकृत वाळू तसेच ओव्हलोड डंपर वाहतूकीला जोरदार लगाम लावला आहे अलीकडे अशा चोरट्या वाहतुकीवर धडक कारवाई चे सत्र त्यांनी हाती घेतले आहे त्यामुळे अनधिकृत चोरटी वाळु वाहतूक करण्याबरोबरच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात अद्यापही वाळूचा लिलाव न झाल्याने चोरटी वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे, रात्री अपरात्री ही वाहतूक सुरू असते, चोरीटी वाळू वाहतुक सर्वसामान्यांना परवडत असल्याने त्याला मोठी मागणी आहे त्यामुळेच या वाळू वाहतुकीला अलिकडे व्यावसायिकांनी जोर दिला आहे. सावंतवाडी तालुक्यात दिवसा व रात्रीही तहसीलदार श्री म्हात्रे यांच्या सूचनेनुसार महसुलाच्या पथकाने अलिकडे मोठ्या कारवाया केला आहेत. ओव्हरलोड खडी, दगड वाहतुकीवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी रात्री अशीच अनधिकृत चोरटी वाळू करणाऱ्या चार डंपरना ताब्यात घेण्यात आले, रात्री बारा वाजता इन्सुली चेक पोस्टवर पोलिस व महसुलच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई करण्यात आली. यावेळी तलाठी एस ए मुळीक, एम एस काटे उपस्थित होते. ताब्यात घेतलेल्या संबधीत डंपरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page