देवगड ग्रामसेवक संघटना अध्यक्षपदी मधुरा राणे…

सचिवपदी श्रद्धाआळवे ;सर्व निवडी बिनविरोध

⚡देवगड ता.०१-: देवगड तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्षपदी श्रीम.मधुरा सदाशिव भुजबळ -राणे व सचिव पदी श्रीमती श्रद्धा चेतन वळंजू -आळवे यांची निवड नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध करण्यात येऊन उर्वरित कार्यकरणी पदाधिकारी पदी देखील सर्व महिला ग्रामसेविका याची निवड बिनविरोध करण्यात आली .

ग्रामसेवक संघटनेच्या इतिहासात प्रथमच संघटनेच्या अध्यक्ष सचिव पदासह सर्व पदाधिकारी महिलांची नियुक्ती करून देवगड तालुका ग्रामसेवक संघटनेने एक नवा आदर्श घालून देत असताना महिलांना १००/% आरक्षण देऊन महिलाराज आणले आहे.
उर्वरीत कार्यकारणी महिला पदाधिकारी पुढील प्रमाणे
उपाध्यक्ष
श्रीम. प्रांजल पांडुरंग शेडगे – गोवळकर
कार्याध्यक्ष श्रीम. भाग्यश्री गजानन सरोदे
सहसचिव श्रीम. रुमा राम फड
कोषाध्यक्ष श्रीम. मनीषा दिगंबर पाटील
कायदेविषयक सल्लागार श्रीम. विद्या भिकाजी जाधव
संघटक श्रीम. प्रीती चक्रधर ठोंबरे
प्रचार प्रसिद्धी प्रमुख श्रीम. सुषमा जाबूवंत खरवडे – या प्रमाणे निवडण्यात आले आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश राजाराम राणे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांनी काम पाहिले.
या ग्रामसेवक संघटनेच्या कार्यकारिणीची निवड पाच वर्षाकरिता आहे.त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामसेवक संघटनेच्या मावळत्या सर्व कार्यकारणी पदाधिकारी तसेच ग्रामसेवक ग्रामसेविका यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page