भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची गांधी चौकात गर्दी
⚡सावंतवाडी ता.३०-: दोडामार्ग येथून निघालेली शिव शौर्य यात्रेचे जंगी स्वागत सावंतवाडी शहरात करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात आ ताषबा जीत सावंतवाडी कराने व भाजप बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांनी गांधी चौकात स्वागत केले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष संजू परब मनोज नाईक जिल्हा बँक संचालक महेश सारंग रवींद्र मडगावकर भाजपच्या सावंतवाडी शहर महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर शहराध्यक्ष अजय गोंदावळे आनंद नेवगी दिलीप भालेकर दिपाली भालेकर चंद्रकांत जाधव परीक्षित मांजरेकर विनोद सावंत बंटी पुरोहित बाळू देसाई मानसी धुरी श्री पेडणेकर यात्रा प्रमुख तथा बजरंग दल संयोजक गौरव शंकरदास धर्मप्रसार प्रमुख सुनील सावंत कोषाध्यक्ष रवी सातावडेकर सहपुरुषाध्यक्ष विनायक रांगणेकर किशोर चिटणीस विशाखा रांगणेकर सौ वझे आधी उपस्थित होते .
यावेळी जय शिवाजी जय भवानी चा गजर ही करण्यात आला.सावंतवाडी शहरात टोपीवाला तांत्रिक महाविद्यालय पोलीस लाईन येथून ही यात्रा सावंतवाडी संपूर्ण बाजारपेठ असे निघाली यावेळी सावंतवाडी शहरात त्यांचे सगळे सावंतवाडी संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यानंतर ते ती यात्रा मार्गस्थ होत शिरूर नाका मिलाग्रीस हायस्कूल जयप्रकाश चौक गांधी चौक रामेश्वर प्लाझा भोसले उद्यान राजवाडा अशी निघाली सावंतवाडी शहरात शिव शौर्य यात्रेने सावंतवाडी नगरी शिवमय झाली होती.
