तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध निवड

*💫देवगड दि.०८-:* देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध निवड झाली. देवगड तालुका पत्रकार समितीच्या नुतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया देवगड येथील स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात सोमवारी निरिक्षक रमेश जोगळे आणि एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीचे मावळते अध्यक्ष प्रशांत वाडेकर, उपाध्यक्ष दयानंद मांगले, साईनाथ गांवकर, सचिव स्वप्नील लोके, खजिनदार दिनेश साटम, सहसचिव नागेश दुखंडे, ज्येष्ठ पत्रकार दयाळ कांबळे, पपू निमणकर आदी उपस्थित होते. निरिक्षक एकनाथ पवार आणि रमेश जोगळे यांच्या उपस्थितीत नुतन कार्यकारणी निवडण्यात आली.या कार्यकारणीची निवड बिनविरोध झाली. अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर, उपाध्यक्ष दयानंद मांगले व अनिल राणे, सचिव सचिन लळीत, खजिनदार श्रीकृष्ण रानडे, सहसचिव महेश तेली, कार्यकारणी सदस्य संतोष कुळकर्णी, सुरज कोयंडे, प्रशांत वाडेकर, गणेश आचरेकर, बाळा कदम यांची बिनविरोध निवड झाली. निरिक्षक एकनाथ पवार, रमेश जोगळे, मावळते अध्यक्ष प्रशांत वाडेकर यांनी नुतन अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर व कार्यकारणीचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page