बांद्यात पृथ्वी वाचवणारा देखावा ठरतो आकर्षण

सिंधुदुर्गसह गोव्यातील नागरिकांची पाहण्यास गर्दी : शाळकरी मुले करतात माहिती संकलन

⚡बांदा ता.२८-: बांदा येथे कोचरेकर कुटुंबीयांनी गणेश चतुर्थी निम्मित करण्यात आलेला पृथ्वीसह मानवी आरोग्य वाचविणार पर्यावरण पूरक देखावा बांदा दशक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील नागरिकांनी व शाळकरी मुलांनी देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

यापूर्वी असे देखावे हे सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी पाहावयास मिळत होते. मात्र कोचरेकर कुटुंब आणि एस के बॉयझ यांनी मिळून पर्यावरणाचा विचार करायला भाग पाडणारा देखावा करून सर्वांनाच आश्चर्य केले आहे .
या देखाव्यात मनुष्याकडून होणारी वृक्षतोड आणि त्याचे भयानक परिणाम निदर्शनास आणले आहेत. झाडांची कत्तल केल्याने पाण्याच्या पातळीत होणारी घट, यामुळे पृथ्वीचे होणारे नुकसान आणि त्याचा ओझोन थरावर होणारा परिणाम याचे सविस्तर देखावारूपी मार्गदर्शन दशक्रोशीतील नागरिकांना होत आहे.
गावातील पेंटर संघटना पुरस्कृत 100 सुपारीची झाडे दिली. देखावा बघायला समूहाने येणाऱ्याना एक सुपारीचे झाड देऊन वृक्षारोपण करा व पृथ्वी वाचविण्याचे आवाहन करत आहेत. सदर दिवस अकरा दिवस असणार आहे.

You cannot copy content of this page