नवे जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजींची सुरू…

अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठवले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामे: प्रामाणिक कार्यकर्त्यांचा अपमान केल्याचा देखील केला आरोप..

⚡सावंतवाडी ता.२८:- काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून इर्शाद शेख यांची तडकाफडकी उचल बांगडी करून नवे जिल्हाध्यक्षपदी समीर वंजारी यांची नियुक्ती करण्यात आल्या नंतर जिल्हा काँग्रेस मधून , प्रदेश काँग्रेस विरोधात नाराजीचे सुरू उमटत असून, जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे.

यावेळी पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाकडून किंमत दिली जात नसून तडका फडकी करण्यात आलेली नियुक्ती प्रामाणिक कार्यकर्त्याचा अपमान आहे असा आरोप देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

You cannot copy content of this page