दत्ता सामंत यांची माहीती ; प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांच्या गाण्याच्या कार्यक्रमासह इंदुरीकर महाराज यांना पाहण्याची संधी..
⚡सावंतवाडी ता.२८-: भाजप युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवसानिमित्त ९ ते १५ ऑक्टोबर असे आठवडाभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध सामाजिक व सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांने साजरा होणार असून यासाठी विशाल परब मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले असल्याची माहीती भाजपा नेते दत्ता सामंत यांनी दिली.
सावंतवाडी तालुक्यासह कुडाळ दोडामार्ग व वेगुर्ले तालुक्यात हे कार्यक्रम होणार असून ९ आक्टोबरला याचा शुभारंभ कुडाळ वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प इंदुरीकर महाराज याच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाने होणार असून सांगता १५ ऑक्टोबरला सावंतवाडीत जुबिन नौटियाल यांच्या लाईव्ह गाण्याच्या शो ने होणार असल्याचे श्री सामंत म्हणाले.
श्री सामंत यांनी सावंतवाडीत यासंदर्भात पत्रकार परिषदेत घेतली यावेळी त्यांच्यासमवेत रणजित देसाई, बाळू परब, संजू परब, मनोज नाईक, रुपेश कानडे,दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, मोहन सावंत, प्रकाश मोर्ये आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, भाजपाचे युवा नेतृत्व असलेले श्री परब गेली काही वर्ष सातत्याने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवित आले आहे वेळोवेळी त्यांनी सामाजिक उपक्रम हाती घेत अनेकांना मदतीचा हात दिला आहे. जे कार्यक्रम येथील जनतेला पाहायला मिळत नाही ते कार्यक्रम त्यांनी येथे राबविले. आताही त्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम हाती घेतले आहे. यात ९ आक्टोबरला विशाल अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार असून यासाठी माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यानंतर ६ वाजता ह भ प इंदुरीकर महाराज याचे किर्तन श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे होणार आहे, ११ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वा. दोडामार्ग येथे सिने अभिनेता क्रांती मेळेगावकर प्रस्तुत न्यु होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर १३ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वा. वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहीलीच भव्य दिव्य विशाल दांडिया स्पर्धा होणार आहे. १५ ऑक्टोबरला शेवटच्या दिवशी सावंतवाडी जिमखाना मैदानावर संध्याकाळी ६ वाजता विशाल परब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे याला केद्रीय मंत्री नारायण राणे याच्यासह पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे नेते तसेच जिल्हातील भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर ७ वाजता जुबिन नौटियाल यांचा तरुण तरुणींना भुरळ घालणारा लाईव्ह गाण्यांचा शो होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन श्री सामंत यांनी केले.
