खरेदी विक्री संघाच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर…

शेती क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या सात जणांची पुरस्कारासाठी निवड: ३० रोजी वितरण…

⚡वैभववाडी ता.२७ संजय शेळके-: तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले. शेती क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या सात जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी हे जाहीर केले.या पुरस्कारांचे वितरण ३० सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.दरम्यान संघाने यावर्षी खतविक्री,भातखरेदी आणि इतर खरेदीविक्रीतुन २ कोटी ९६ लाख ७७ हजार ९६३ रूपयांची केल्याची माहीती श्री.रावराणे यांनी येथे दिली.

येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली.यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष अंबाजी हुंबे,संचालक सीमा नानीवडेकर,रवींद्र पवार,महेश रावराणे,उज्वल नारकर,आदी उपस्थित होते.

श्री.रावराणे यांनी संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार जाहीर केले.यावर्षी उत्कृष्ट भात उत्पादक शेतकरी-सुभाष काशिराम राणे-सडुरे,काजु उत्पादक शेतकरी मनोहर शिवराम फोंडके,हेत,ऊस उत्पादक शेतकरी-पुंडलिंक सहदेव साळुंखे,प्रयोगशील शेतकरी मंगेश परशुराम कदम,खांबाळे,उत्कृष्ट पशुपालक शेतकरी संतोष गोविंद ईस्वलकर,कोकिसरे,भरडधान्य महादेव सुर्याजी वाडेकर,नानीवडे यांची पुरस्कार समितीने निवड केली असुन या पुरस्कारांचे वितरण ३० सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे असं श्री.रावराणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page