पथदिप कार्यान्वित झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान….

मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर:सरपंच प्रणाली खानोलकर यांच्या हस्ते शुभारंभ…

वेंगुर्ला प्रतिनिधी- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खासदार निधीतून खानोली गावातील सावंतवाडा व धनगरवाडी स्ट्रीट लाईटसाठी ५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला होता. यातून गणेश चतुर्थीपूर्वीच दोन्ही वाडीतील पथदिप सुरू केल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधानाचे वातावरण आहे.

  सरपंच प्रणाली खानोलकर यांच्या हस्ते पथदिप सुरू करण्यात आले. यावेळी भाजपाचे बाळू देसाई, सुहास गवंडळकर, मनवेल फर्नांडीस, बाबली वायंगणकर, बाळा सावंत, सुधीर गावडे, सुभाष खानोलकर, बाळू खानोलकर, सुनिल घाग, मनोहर खानोलकर, सुनील सावंत, सचिन नार्वेकर, बाबा मोर्ये आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
You cannot copy content of this page