⚡सावंतवाडी ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन पाटकर यांनी मागील काळात केलेल्या सोशल मीडियाच्या कामाची दखल घेता महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष महादेव बालगुडे व कार्याध्यक्ष मोहसीन शेख यांनी कोकण विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रा. पाटकर यांना देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे तडफदार नेतृत्व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली चार जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोकण विभागाचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली हे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
राज्यसमन्वयक महाराष्ट्र प्रदेश सुहास उभे ,ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस तेजस फणसे, सोशल मीडियाचे पदाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात प्रा.पाटकर कार्यरत असून यापुढील काळात संपूर्ण कोकण बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोशल मीडिया करिता भरीव कामगिरी करून पक्षाला बळकटी देण्याचे कार्य सदैव करत राहू.
