सावंतवाडी पुणे निगडी बस सेवा आजपासून सुरू…

प्रवाशांना मिळणार आरामदायी प्रवास:मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी पुणे निगडी या नॉन एसी आरामदायी एसटी बसचा शुभारंभ आज सावंतवाडी बस स्थानकात शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला घरची बस प्रवाशांना निश्चितच आरामदायी असे ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने स्वतः बांधलेली नॉन एसी स्लीपर कोच बस महाराष्ट्रात पहिल्यांदाच सावंतवाडी बस स्थानकाला देण्यात आली त्यामुळे सावंतवाडी पुणे निगडी या प्रवासाला सुरुवात झाली या बसचे शुभारंभ श्री केसरकर यांच्या हस्ते कापून करण्यात आले.यावेळी श्री. केसरकर पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी केसरकर पुढे बोलताना म्हणाले की पुणे निगडीला आपल्या कोकणातील अनेक लोक राहतात त्यांच्याकडून गेले अनेक वर्षाची मागणी होता तसेच ही बस शिवशाही पेक्षा 15 रुपये तिकीट कमी दराने मिळेल त्यामुळे लोकांनी या बसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन देखील श्री.केसरकर यांनी यावेळी केली. तसेच राज्यात पहिली बस ही सावंतवाडी मतदारसंघाला मिळाली याबद्दल महाराष्ट्र एमडी यांच्या देखील श्री.केसरकर यांनी आभार मानले.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नीलिमा चलवाडी, परशुराम चलवाडी नंदू शिरोडकर, एसटी कर्मचारी अधिकारी व शिवसेने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page