माडखोलातील शेतकऱ्यांना मंत्री दीपक केसरकरांकडून आर्थिक मदत…

पाण्याअभावी झाले होते शेतीचे नुकसान; ग्रामस्थांच्या माध्यमातून राजकुमार यांनी मंत्री केसरकर यांचे मानले आभार…

⚡सावंतवाडी ता.१८-: माडखोल धरणाच्या कालव्यातून पाणीपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकुमार राऊळ यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वखर्चातून आर्थिक नुकसान भरपाई केली आहे सदरची रक्कम केसरकर यांनी आज राजकुमार राऊळ यांच्याकडे सुपूर्त केली. बाबत शेतकऱ्यांच्या वतीने श्री राऊळ यांनी मंत्री केसरकर यांचे आभार व्यक्त केले.

माडकोल धरणाच्या पाण्यासंदर्भात राजकुमार राऊळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल किती 29 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत साखळी उपोषण सुरू केले होते. सदरचे उपोषण ओके सरकर यांच्या मध्यस्थी नंतर स्थगित झाले होते यावेळी केसरकर यांनी संबंधित शेतकऱ्यांना पाणीपुरवठा न झाल्यास आपण नुकसान भरपाई देऊ असे सांगितले होते ते सरकार यांनी त्यावेळी दिलेला शब्द पाळा असून आज त्यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर माडखोल गावातील शेतकऱ्यांना स्वखर्चातून आर्थिक मदत केली

You cannot copy content of this page