छत्रपतींचा पुतळा किल्ल्यातच व्हावा….

हरी खोबरेकर: आवश्यकता असल्यास आम्ही प्रशासनासोबत जमीन मालकांशी चर्चा करू,..

⚡मालवण ता.१६-: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा किल्ले सिंधुदुर्ग याच ठिकाणी होणे आवश्यक आहे, आमचीही तीच इच्छा आहे आणि भुमीकाही राहणार आहे. आजही आमची आवश्यकता असल्यास आम्ही प्रशासनासोबत जमीन मालकांशी चर्चा करू, अशी भूमिका मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर म्हणाले. प्रशासनाने किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी छत्रपतींचा पुतळा अवश्य उभारावा मात्र त्याचबरोबर राज्य शासनाने किल्ल्यावरील नागरिकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या नळपाणी योजना आणि किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी एलईडी प्रकाश योजना या दोन कामांवरील स्थगितीही उठवून या कार्यक्रमासाठी आपले योगदान द्यावे, असा टोला श्री. खोबरेकर यांनी मारला. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीसाठी आकर्षक सिंहासन साकारण्यात आलेले आहे. तसेच मंदिराच्या नुतनीकरणाचेही काम करण्यात आलेले आहे. आता राज्य शासनाने रोखलेली कामेही यानिमित्ताने पूर्ण करावीत. तसेच किल्ल्याच्या परिसरातील साफसफाईसाठी खास निधीही वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही श्री. खोबरेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page