⚡मालवण ता.१६-:
केंद्र शासना कडून संपूर्ण देशात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगमध्ये मालवण शहराचा मालवण नेव्हीगेटर्स (Malva Navigators) हा संघ सहभागी झालेला आहे. या लीगमध्ये मालवण शहराला जिंकवून देण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी Malvan Navigators या संघाचे सभासद होणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी https://innovateindia.mygov.in/islseason2/ लिंक वर क्लीक करून आपण आपली नोंदणी करावी असे आवाहन मालवण नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मालवण शहरातील नागरिकांनी सदर लिंकवर क्लिक करून व मालवण शहराला कचरा मुक्त करण्याच्या या लढाईत सहभागी होऊन शहराला इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत विजयी करण्यासाठी सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी अनिकेत चव्हाण ९१७५१९९७८०, भास्कर राऊळ – ८८८८३८१२६८ यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
