सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचे १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत वादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष आमंत्रण

⚡कणकवली ता.१४-: एन. बी. एस. चॅरीटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाला निमंत्रण आलय तेही थेट दिल्लीहून निमित देखील खास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि द्वारका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मैदानाच्या उद्घाटनासाठी कणकवलीचा अभिमान सिंधुगर्जना ढोलताशा पथक रामनवमीला मध्यप्रदेश दौरा देखिल यशस्वी करुन आले होते आता दिल्लीमध्ये त्यांना खास निमंत्रित केल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे .

दिल्लीसाठी सिंधुगर्जना पथक दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता मोपा विमानतळ गोवा येथून कार्याध्यक्ष सर्वेश हरीभाऊ भिसे, पथक प्रमुख नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रवाना होणार आहे.

You cannot copy content of this page