स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१४-: भारताच्या कार्यकारी व राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त झालेली हिंदी भाषा ही आपल्या भारतात जास्तीत जास्त प्रमाणात बोलली जाते. असा हा हिंदी भाषा दिवस आज स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी हिंदिदिनाला अनुसरून घोषवाक्य असलेले बॅनर हातात घेऊन घोषणा दिल्या.

तर इयत्ता ३ री, ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांनी कबीरदासांचे दोहे सादर केले व त्याचा अर्थ सांगितला. वरील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत रॅली काढली. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी हिंदी भाषेचे व हिंदी दिनाचे महत्त्व पटवून दिले. शाळेतील सहा. शिक्षिका सौ. कविता सबलपारा,सौ. अंकिता गवस, सौ. निकिता मडगावकर व सौ. नफिसा शेख यांचे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शालेय सहा. शिक्षिका सौ. कविता सबलपारा यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवस १४ सप्टेंबरला का साजरा केला जातो? या विषयी माहिती सांगितली. तसेच शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे , स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये हिंदी दिवस अतिशय उत्साहात साजरा केला गेला.

You cannot copy content of this page