चंदगडकडे जाणाऱ्या टाटा सुमोत आढळली गोवा बनावटीची दारु
⚡दोडामार्ग,ता.१३-: वीजघर येथील तपासणी नाक्यावर गोव्याहून चंदगडकडे जाणाऱ्या टाटा सुमोची झडती घेतली असता त्यात गोवा बनावटीची ७८ हजार ९६० रुपयांची दारू सापडली. पोलिसांनी याप्रकरणी मनोज विठोबा तुपारे (वय ४२,रा.पाटणे,ता.चंदगड,जिल्हा कोल्हापूर) व विजय वामन कळंगुटकर (वय४३, रा.हेरे,ता.चंदगड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी टाटा सुमोसह (एम एच ४२ एच २१५३) गोवा बनावटीची दारू मिळून एकूण १ लाख ७८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देसाई तपास करीत आहेत.
