शिरवल तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रमोद नानचे

⚡कणकवली ता.१३-: शिरवल गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रमोद पांडुरंग नानचे यांची निवड झाली आहे .शिरवल ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली.यावेळी नानचे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी शिरवल ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन अध्यक्ष प्रमोद नानचे यांचे सरपंच गौरी वंजारे आणि पोलीस पाटील श्वेता राऊळ यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले

यावेळी‌ सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रविण तांबे,प्रभारी पोलिस पाटील सौ.श्वेता राऊळ , ग्रामसेवक सौ.वर्षा कदम, प्रमोद सावंत ,अजित सावंत, तुळशीदास कुडतरकर,बाळा सावंत, ग्रा.पं.सदस्य रविकांत तांबे,ग्रा.पं.सदस्या सौ.चैताली पांचाळ, सुर्यकांत सावंत, विजय तांबे,डाटा ऑपरेटर राजेंद्र सावंत,ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा कासले,संजय सावंत, सखाराम गुरव आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page