आरोंदा परेल बससेवा पूर्ववत सुरू…

ठाकरे शिवसेनेच्या मागणीला यश:संजय गावडे यांनी केला शुभारंभ

वेंगुर्ले
मागील काही महिन्यांपासून बंद असलेली आरोंदा परेल ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेचा वेंगुर्ले बसस्थानक येथे एस. टी . कामगार सेना वेंगुर्ले तालुका अध्यक्ष संजय गावडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. उद्धव ठाकरे शिवसेना वेंगुर्ले च्या वतीने संबंधित विभागाकडे निवेदना द्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.दरम्यान या मागणीची दखल घेऊन ही बससेवा सूरू झाल्याने प्रवासी तसेच चाकरमानी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.


यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत (बाळू) परब ,शहर प्रमुख अजित राऊळ ,वायगणी माजी सरपंच सुमन कामत , वाल्मिकी कुबल , विभाग प्रमुख संदीप पेडणेकर , दिलीप राणे ,सहाय्यक वाहतूक निरीक्षक लालसिंग पवार , डेपो मॅनेजर राहुल कुंभार , संघटना उपाध्यक्ष मकरंद होळकर ,सचिव मार्टिन दिसोजा , खजिनदार विवेक नवार , सहखजिनदार अभि परब , महिला संघटक निहारिका होळकर ,सदस्य विजय सोनावणे ,अमित नलावडे , तात्या सातार्डेकर ,सुमन गोसावी ,राहुल आरोलकर , महादेव म्हापसेकर , एस. एस . मयेकर ,गुरुप्रसाद गावडे ,अक्षय ऐसाजी , रामचंद्र पालकर , ज्ञानेश्वर पालकर आदींसह पदाधिकारी ,प्रवासी उपस्थित होते .खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक ,कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अनुप नाईक ,सचिव आबा धुरी, ठाकरे सेनेचे यशवंत परब , कामगार सेनेचे संजय गावडे आदिनी विशेष पाठपुरावा केला. ग्रामपंचायत मार्फतही वारंवार मागणी करण्यात आली होती.एस .टी .कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश आले आहे,असे यावेळी अध्यक्ष संजय गावडे यांनी सांगितले.

फोटो

You cannot copy content of this page