कुडाळ प्रभाग क्र. १५ मधील बंद पथदिवे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नाने कार्यान्वित

⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील ९ ठिकाणी बंद असलेले पथदिवे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नाने अखेर चालू करण्यात आलेत.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कुडाळ शहर वारंवार अंधारात राहत होते. इइएसल कंपनीमार्फत शहरात होणारी एलईडी पथदिवे आणि हायमास्ट देखभाल दुरुस्तीची कामे असमाधानकारकरित्या कंपनी करत होती. त्याबद्दल कुडाळ नगरपंचायतच्या सत्ताधारी नगरसेवकांनी हा मुद्दा सर्वसाधारण सभेत उचलून धरून गणेशोत्सव काळापूर्वी कुठल्याही परिस्थितीत प्रभागातील ज्या बंद असलेले पथदिवे रिपेअर करून चालू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी लावून धरली. त्यानुसार गणेशोत्सव काळापूर्वी खाजगी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरला टेंडर देऊन ज्या ठिकाणी बंद असलेले पथदिवे चालू करण्यास प्रशासनास नगरसेवकांनी भाग पाडले. त्यानुसार प्रभाग १५ मधील बंद असलेले पथदिवे नगरपंचायतच्या पुढाकाराने आणि नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नामुळे चालू करण्यात आले. प्रभागमधील नागरिकांनी गणेशोत्सव काळापूर्वी रस्त्यावरील पथदिव्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे नगरपंचायत प्रशासन आणि नगरसेवक उदय मांजरेकर यांचे आभार मानलेत.

You cannot copy content of this page