संदेश पारकर:जिल्हाप्रमुख म्हणून मी राहणार ठाम पाठीशी
मालवण (प्रतिनिधी)
सध्याच्या सरकारमधील मंत्री, आणि राणे यांच्याकडून आम. वैभव नाईक यांना कितीही घेरण्याचा प्रयत्न झाला तरी शिवसैनिकांच्या साथीने सर्व आव्हानांवर मात करून आ. वैभव नाईक पुन्हा एकदा यशस्वी होतील आणि कुडाळ मालवणची जनताही त्यांना साथ देईल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त करत जिल्हाप्रमुख म्हणून मी आम. नाईक यांच्या खंबीरपणे पाठीशी राहीन असे सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक आज मालवण कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी संदेश पारकर बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मालवण शिवसेनेच्या वतीने संदेश पारकर यांचा सत्कार करण्यात आला.
आ. वैभव नाईक म्हणाले, माझी लढाई कोणाशी आहे यापेक्षा कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे लोक ठरवणार आहेत. मी आमदार झाल्यापासून जनतेच्या हितासाठी जनतेत मिसळून त्यांच्या समस्या व प्रश्न सोडवीत आहे. सत्ता असताना आणि नसताना देखील मतदार संघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. यापुढील काळातही माझे असेच प्रयत्न सुरु राहणार, असेही ते म्हणाले. यावेळी भाई गोवेकर यांनीही विचार मांडत मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख सन्मेष परब,माजी नगरसेवक नितीन वाळके,युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, गणेश कुडाळकर, अमित भोगले, भाऊ परब, बाळ महभोज, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे,शहर प्रमुख रश्मी परुळेकर, सिद्धेश मांजरेकर,तपस्वी मयेकर, आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण,आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, पेंडूर विभाग प्रमुख कमलाकर गावडे, पोईप विभाग प्रमुख विजय पालव, भाई कासवकर, प्रशांत सावंत, बाबू टेंबुलकर, दर्शन म्हाडगूत, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, कांदळगाव सरपंच रणजित परब,मसुरे सरपंच संदीप हडकर,तळगाव सरपंच लता खोत, उदय दुखंडे,भाऊ परब, दीपक परुळेकर, किशोर कासले, शिवराम पालव,जयेश नार्वेकर,सतीश राठोड, प्रशांत भोजने,राहुल परब,राहूल सावंत, वायरी माजी सरपंच साक्षी लुडबे,सुर्वी लोणे,निनाक्षी शिंदे,करण खडपे, हिना कांदळगावकर, आरती नाईक,संजना रेडकर,आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
