ह्युमन राईट असोसिएशनतर्फे तहसीलदार यांच्याशी विविध प्रश्नांबाबत चर्चा

⚡कणकवली ता.१२-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली नूतन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्या सोबत विविध सार्वजनिक प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

  यावेळी निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे, कोकण विभाग अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफभाई पीरखान, कणकवली तालुका अध्यक्षा सौ.संजना सदडेकर, उपाध्यक्ष सदाशिव राणे, संघटक मंगेश चव्हाण, डॉ.हर्षदकुमार पटेल, भरत तळवडेकर उपस्थित होते.

तहसीलदार यांच्या सोबत झालेल्या चर्चेमध्ये स्टॅम्प पेपर सर्व बाॅड रायटर यांच्या जवळ उपलब्ध करून देऊन सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी केली असता स्टॅम्प पेपर सर्वच बाॅड रायडर यांच्या जवळ उपलब्ध करून दिले जातील असे सांगितले.नागरिकानी एकाच ठिकाणी गर्दी करण्याची आवश्यकता नाही. तसेच तहसील ऑफिसमध्ये दाखले मिळवून देण्यासाठी अनधिकृत एजंट असतील व तसे निदर्शनास आल्यास अशा एजंटवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्याचप्रमाणे कणकवली शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन रात्रीच्या वेळी दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या जातात.या संदर्भात कणकवली पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार यांनी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी दिले.
You cannot copy content of this page